TSK

TSK · उत्प 1:29

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तसेच खाण्यात येते असे सर्व प्रकारचे अन्न तुझ्याजवळ आणून ते साठवून ठेव. ते तुला व त्यांना खाण्यासाठी होईल.”

तो त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो आणि त्यांना भरपूर अन्न देतो.

तो गुरांढोरासाठी गवत उगवतो, आणि मनुष्यांसाठी वनस्पतीची लागवड करतो; यासाठी की, मनुष्याने जमिनितून अन्न उत्पन्न करावे.

तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो. तो आपला करार नेहमी आठवतो.

जो सर्व जिवंत प्राण्यांना अन्न देतो. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो.

तो आपले घर उच्च स्थळी करील; त्याचे रक्षणाचे स्थान पाषाणाच्या तटबंदीचे दुर्ग असे होतील; त्यांना अन्न व पाण्याचा मुबलक पुरवठा अखंडीत चालू राहील.

‹आमची रोजची भाकर आज आम्हास दे.›

परंतु देवाने अशा गोष्टी केल्या, की त्याद्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे, तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हास आकाशातून पाऊस देतो, योग्यवेळी तो तुम्हास चांगले पीक देतो, तो तुम्हास भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतःकरणे आनंदाने भरतो.

कारण आपण त्याच्याठायी जगतो, वागतो व आहोत तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हणले आहे की, आपण वास्तविक त्याचा वंश आहोत.