¶ देव बोलला, “जले जीवजंतूनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडोत.”
TSK
TSK · उत्प 1:6
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे, आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.
त्याचा नि:श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले.
तो जसे आकाश पसरवतो तसे तू करू शकतो काय? जे आकाश ओतीव आरशाप्रमाणे अढळ आहे?
आकाश देवाचा गौरव जाहीर करते, आणि अंतराळ त्याच्या हातचे कृत्य दाखविते.
परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.
जसे वस्राने तसे तू आपणाला प्रकाशाने झाकतोस; तंबूच्या पडद्याप्रमाणे तू आकाश पसरतोस.
आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा.
जर ढग पावसाने पूर्ण भरलेले असतील; तर ते पृथ्वीवर स्वतःला रिक्त करतात, आणि जर झाड उत्तरेकडे वा दक्षिणेकडे पडले तर ते जेथे पडले तेथेच राहील.
ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याने जग निर्माण केले आपल्या समंजसपणाच्या आधारे आकाश पांघरले.
¶ इस्राएलाबद्दल परमेश्वराचे वचन: ज्याने आकाश विस्तारले आणि पृथ्वीचे पाये घातले, जो मनुष्याच्या आत त्यांच्या आत्म्याची निर्मिती करतो, तो परमेश्वर म्हणतो: