TSK

TSK · उत्प 25:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तू मला इश्माएलविषयी विचारलेस ते मी ऐकले आहे. पाहा, मी आतापासून पुढे त्यास आशीर्वाद देईन, आणि त्यास फलद्रुप करीन आणि त्यास बहुगुणित करीन. तो बारा सरदारांच्या वंशांचा पिता होईल, आणि मी त्यास एक मोठे राष्ट्र करीन.

आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.

मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.

कारण परमेश्वराने मला सांगितले, एका वर्षाच्या आत, जसा मोलकरी एका वर्षासाठी नियूक्त केला जातो, त्याच प्रकारे केदारचे वैभव तुम्ही संपलेले पाहाल.

केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुझ्याकडे एकत्र केल्या जातील. नबायोथचे मेंढे तुझी सेवा करतील. ते माझ्या वेदीवर स्विकार्य असे अर्पण होतील, आणि मी माझ्या तेजस्वी घराला आणखी गौरवीत करीन.

अरबस्तान व केदारचे सर्व प्रमुख तुझ्याबरोबर व्यापारी होते. ते तुला कोकरे, एडके आणि बोकड यांचा पुरवठा करीत होते.