“पाहा, तुझ्यासोबत माझा करार असा आहे: तू अनेक राष्ट्रांचा महान पिता होशील.
TSK
TSK · उत्प 25:23
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
त्यांनी रिबकेला आशीर्वाद दिला आणि तिला म्हटले, “आमच्या बहिणी, तू हजारो लाखांची आई हो, आणि तुझे वंशज त्यांचा द्वेष करणाऱ्यांच्या वेशीचा ताबा घेवोत.”
लोक तुझी सेवा करोत व राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भावांवर राज्य करशील. तुझ्या आईची मुले तुला नमन करतील. तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल आणि तुला आशीर्वाद देणारा प्रत्येकजण आशीर्वादित होईल.”
तुझ्या तलवारीने तू जगशील व आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा तू बंड करशील, तू आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टाकशील.”
याकोब स्वतः पुढे गेला. आपल्या भावापर्यंत पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून त्यास नमन केले.
परंतु त्याचा वडिलाने नकार दिला आणि म्हटले, “माझ्या मुला, मला माहीत आहे. होय, मला माहीत आहे की, तोसुद्धा महान होईल. परंतु धाकटा भाऊ त्याच्यापेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.”
दावीद तर धाकटा होता आणि तीन वडील पुत्र शौलामागे गेले होते.
याच काळात अदोम प्रदेशाला राजा नव्हता. एक कारभारीच इथला कारभार पाहत असे. त्याची नेमणूक यहूदाचा राजा करी.
यानंतर अमस्याने मोठे धाडस करून अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने याठिकाणी सेईर मधील दहा हजार लोकांस ठार केले.
त्यांनी एकमताने, एकत्र मिळून मसलत केली आहे, ते तुझ्याविरूद्ध करार करतात.
¶ जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे? जो राजेशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे? जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारायला सामर्थ्य आहे, तो मीच आहे.
¶ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, अदोमाने यहूदाच्या घराण्याविरूद्ध सूड घेतला आहे आणि असे करून त्यांने अपराध केला आहे.
परमेश्वर असे म्हणतो, “अदोमाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून फिरणार नाही. कारण अदोमाने तलवार घेऊन त्याच्या भावाचा पाठलाग केला. आणि त्याने सर्व दयाशीलपणा काढून टाकला. त्याचा क्रोध कायम राहिला, आणि त्याने आपला राग सतत बाळगला.
आणि एसावाच्या पर्वताचा न्याय करायला तारणारे सीयोन पर्वतावर चढून जातील आणि राज्य परमेश्वराचे होईल.
आणि इतकेच नाही; पण ज्या एकापासून, म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून रिबेका गरोदर असतेवेळी,