तू जर चांगल्या गोष्टी करशील तर, मग तुझाही स्विकार केला जाणार नाही का? परंतु तू जर योग्य ते करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे, परंतु तू त्यावर नियंत्रण केले पाहिजेस.”
TSK
TSK · उत्प 3:16
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या स्त्रीने वचनाची पूर्तता करावी.
तेव्हा त्याची सून फिनहासाची पत्नी गरोदर होती ती प्रसूत होणार होती; देवाचा कोश नेलेला आहे व आपला सासरा व आपला पती हे मरण पावले आहेत असे वर्तमान ऐकताच ती लवून प्रसूत झाली कारण तिला कळा लागल्या होत्या.
जेव्हा राजाच्या या विशाल साम्राज्यात ही आज्ञा एकदा जाहीर झाली की, सर्व स्त्रिया आपापल्या पतीशी आदराने वागतील. लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या स्त्रिया आपल्या पतींचा मान ठेवतील.
ते अगदी घाबरतील; प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा व वेदना यांनी त्यांना घेरले आहे. ते विस्मयाने एकमेकांकडे पाहतील; त्यांची मुखे ज्वालेच्या मुखांसारखी होतील.
जेव्हा एखादी स्त्री प्रसूतीची वेळ जवळ आली म्हणजे ती वेदनेने विव्हळते आणि आपल्या वेदनांमध्ये ओरडते, प्रभू, तसे आम्ही तुझ्यापुढे आहोत.
त्यामुळे मी दुःखाचा आवाज ऐकतो आहे, पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तसाच सियोनकन्येचा आवाज मी ऐकला आहे. ती श्वासाकरता धडपडत आहे, ती आपले हात पसरत आहे, “मला हाय हाय! कारण माझ्या घातक्यांमुळे माझा जीव कंटाळला आहे!”
ज्यांना तू आपले मित्र होण्यास शिकवले, त्यांच्यावर देव जेव्हा तुला ठेवणार, तेव्हा तू काय करशील? जसे प्रसुतपावणाऱ्या स्त्रीला वेदना वेढतात, त्याचप्रमाणे हा तुझ्या वेदनांचा प्रारंभ नाही काय?
दिमिष्क फार दुबळे झाले आहे. ती पळून जाण्यास माघारी फिरली आहे. दहशतीने तिला वेढले आहे. दुःखाने तिला घेरले आहे, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेदना होत आहेत.
‹स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; पण बालक जन्मल्यावर जगात एक मनुष्य जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही.›
परंतु तुम्हास हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे आणि प्रत्येक पुरूष हा स्त्रीचे मस्तक आहे आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे
¶ पत्नींनो, जशा तुम्ही प्रभूच्या अधीन होता, तशा आपल्या पतीच्या अधीन असा.
“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत.
तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल, ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रपण यांमध्ये राहिल्यास हे होईल.
¶ आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे कारण ते तुमचे शुद्ध, आदराचे आचरण पाहतील.