TSK

TSK · उत्प 49:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

इस्राएल त्या देशात राहत होता, त्या वेळी रऊबेन, आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला, हे इस्राएलाने ऐकले. याकोबाला बारा पुत्र होते.

इस्राएलाचे जे पुत्र त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी: याकोबाचा प्रथम जन्मलेला रऊबेन;

¶ इस्राएलाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी त्यांची गणना करण्यात आली. ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; त्यांची यादी घराणी आणि कुळे ह्याच्याप्रमाणे करण्यात आली.

त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्र नावडतीचा मुलगा असला तरी त्याचा स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्यास दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे.

रऊबेनचे लोक मोजकेच असले तरी ते जगोत, त्यांना मरण न येवो.”

¶ रऊबेन इस्राएलाचा थोरला पुत्र होता. पण त्याने आपल्या पित्यांचे अंथरूण अशुद्ध केले म्हणून त्याच्या जेष्ठपणाचे अधिकार योसेफाच्या पुत्रांना दिले. म्हणून थोरला पुत्र म्हणून त्याची नोंद नाही.

त्याने मिसरमध्ये प्रथम जन्मलेले सर्व, हामाच्या तंबूतील त्यांच्या शक्तीचे प्रथम जन्मलेले मारून टाकले.

एफ्राईमाच्या दक्षिण सीमेच्या पूर्वबाजूपासून ते पश्चिमबाजूपर्यंत एक विभाग रऊबेनाचा.