TSK

TSK · इब्री 9:2

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे.

सोन्याच्या आकड्याखाली हा पडदा ठेवावा मग त्याच्यामागे आज्ञापटाचा कोश-ठेवावा; हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान यांना अलग करील;

¶ त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: एक गोऱ्हा व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत;

¶ मग त्या कसबी कारागिरांनी दहा पडद्यांचा निवासमंडप बनविला. त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी कुशल कारागिराकडून करुब काढले.

¶ अशा प्रकारे पवित्र निवासमंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.

“पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर.

परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवासमंडप उभा केला; प्रथम त्याने उथळ्या बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळ्या लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले;

¶ तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी.