TSK

TSK · होशे 4:1

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो: ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. आकाशातले त्याचे सर्व सैन्य त्याच्या शेजारी उभे आहे.

सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका; गमोराच्या लोकांनो आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष्य द्या.

परमेश्वर न्याय करण्याकरिता न्यायसभेत उभा राहिला आहे, त्याच्या लोकांचा न्याय करण्याकरिता तो उभा राहिला आहे.

याकरिता, जे तुम्ही थट्टा करता, आणि जे तुम्ही यरूशलेमेवर राज्य करता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन काय म्हणते ते ऐका.

कारण सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस आहे. आणि सियोनेवर अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे.

जे तुम्ही परमेश्वराच्या वचनाने थरथर कापता ते तुम्ही त्याचे वचन ऐका, तुमच्या ज्या भावांनी तुमचा द्वेष केला, ज्यांनी माझ्या नावा करीता तुम्हास बाहेर टाकले आहे, ते म्हणाले की आम्ही तुमचा हर्ष पाहावा असा परमेश्वराचा महिमा होवो. पण ते लाजवले जातील.

म्हणून मी अजूनही तुमच्यावर दोषारोप ठेवणार आहे आणि तुमच्या नातवंडानासुद्धा दोषी ठरवीन, परमेश्वर असे म्हणतो.

या कारणामुळे भूमी शोक करणार आणि वर आकाशे काळोख होतील. कारण मी माझे बेत घोषीत केले आहेत, मी त्यापासून माघार फिरणार नाही.”

“कारण त्यांच्यातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ते सर्व अप्रामाणिक मिळकतीचा लोभ धरतात. भविष्यवाद्यांपासून ते याजकापर्यंत, त्यांच्यातील प्रत्येकजण फसवे काम करतो.

म्हणून तू त्यांना पुढील गोष्टी सांग. ज्या राष्ट्रांने परमेश्वराचे म्हणजेच त्यांच्या देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि शिक्षा घेतली नाही, ते हेच आहे. सत्यता ही त्यांच्या मुखातून छेदून टाकलेली आहे.

तर स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या मुखातील निघणाऱ्या संदेशाकडे चित्त लावा. नंतर तुमच्या मुलींना मोठ्याने विलाप करण्यास शिकव आणि शेजारील प्रत्येक स्त्रीला शोकगीत शिकवा.

तू असे म्हण, तुझ्याबरोबर असलेल्या लोकांस सांग, यहूदाच्या राजांनो आणि यरूशलेमेच्या राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा! मी या ठिकाणी अरिष्ट आणणार, आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकाचे कान झिणझिणतील.

¶ सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याबद्दल असे म्हणतो की, तुला तलवारीने मृत्यू येणार नाही.

याजकांनो! हे ऐका, इस्राएलाच्या घराण्या लक्ष दे, हे राजघराण्या ऐक, तुम्हा सगळ्यांचा न्याय होणार आहे तुम्ही मिस्पावर पाश आणि ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.

परमेश्वराचा वाद यहूदाशी आहे. आणि तो याकोबास त्याच्या कृत्याचे शासन करील. त्यांचे प्रतिफळ त्यास मिळेल.

अहो वडिलांनो, हे ऐका, आणि देशात राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी कान द्या. तुमच्या पूर्वजांच्या दिवसात किंवा तुमच्या दिवसात पूर्वी कधी असे हे घडले काय?

म्हणून आता परमेश्वराचे वचन ऐक, ‘इस्राएलविरुध्द संदेश सांगू नकोस, इसहाकच्या घराण्याविरुध्द प्रवचन देऊ नकोस’ असे तू मला सांगतोस.

धार्मिक मनुष्य पृथ्वीवरून नष्ट झाला आहे, आणि मनुष्यांमध्ये कोणीही सरळ नाही; ते सर्व रक्त पाडायला टपतात; ते प्रत्येकजण जाळे घेऊन आपल्या भावाची शिकार करतात.

¶ आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.

¶ ‹पवित्र आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवतो त्यास दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही.›