पण यशुरुन पुष्ट होऊन लाथा झाडू लागला. तो धष्टपुष्ट झाला! तो लठ्ठ झाला, तो तुकतुकीत झाला आणि त्याने आपल्या तारणकर्त्या देवाचा त्याग केला! आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला.
TSK
TSK · होशे 4:7
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ आमच्या वाडवडिलांच्या वेळेपासून आतापर्यंत आम्ही महान पापांचे दोषी आहोत. आमच्या अपराधांमुळे आमचे राजे आणि याजक यांना या जगिक राजाच्या हाती तलवार व बंदीवास, लुटालुट आणि मुखलज्जेला, आज आम्ही जसे आहोत तसे दिलेत.
ते खातील पण ते त्यास पुरणार नाही; ते व्यभिचार करतील पण त्यांची वाढ होणार नाही, कारण ते आपला देव, परमेश्वर, यापासून खूप दूर गेले आहेत.
जशी लुटारुंची टोळी टपून बसते, तसा याजकांचा समूह आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात, त्यांनी महापातके केली आहेत.
जेव्हा तुम्हास चारा मिळाला तेव्हा तुम्ही तृप्त झालात, आणि जेव्हा तुमचे पोट भरले तेव्हा तुमचे हृदय उन्मत्त झाले; त्या कारणास्तव तुम्ही मला विसरला.
तू गौरवाने नाही तर अप्रतिष्ठेणे भरला आहेस! तू पण त्याची चव घे आणि आपली नग्नता प्रकट कर! परमेश्वराच्या उजव्या हातांतला प्याला तुझ्याकडे फिरत येईल, आणि तुझ्या सर्व गौरवावर अप्रतिष्ठा पसरवली जाईल.
नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात.