TSK

TSK · यश 10:32

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तेव्हा दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला, “राजाने मला काही काम करायला आज्ञापिले आहे आणि त्याने असे म्हटले की, ज्या कामाविषयी मी तुला पाठवतो व जे मी तुला आज्ञापिले आहे ते कोणाला समजू देऊ नको; तरुणांनी अमक्या अमक्या ठिकाणी असावे म्हणून मी त्यांना नेमले आहे.

¶ हिज्कीयाने परमेश्वरावर भरवंसा ठेवून केलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब यहूदावर चाल करून आला. नगराच्या तटबंदी बाहेर त्याने आपल्या सैन्यासह तळ ठोकला. आतील नगरांचा पाडाव करून ती जिंकून घ्यायचा त्याने बेत केला.

शेवटल्या दिवसात, परमेश्वराचे डोंगरावरील मंदिर, पर्वताच्या सर्वात उंच जागी स्थापण्यात येईल, आणि ते डोंगरावर उंच होईल; व सर्व राष्ट्रे त्याकडे लोटतील.

¶ म्हणून सेनाधीश प्रभू परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोननिवासी लोकांनो, अश्शूराला भिऊ नका, तो तुला छडीने मारील व मिसराने केल्याप्रमाणे तुझ्यावर काठी उगारेल.

उघडया डोंगरावर इशारा देणारा ध्वज उभारा, त्यांना मोठयाने हाक मारा, त्यांनी सरदारांच्या द्वारात यावे म्हणून त्यांना हाताने खुणवा.

पण मी अरीएलला शिक्षा करीन आणि त्यामुळे ती दु:ख व शोक करील, आणि ती मला अरीएलासारखी होईल.

ते धनुष्य आणि भाला उचलतील. ते क्रूर आहेत आणि ते दया करीत नाही. त्यांचा आवाज समुद्राच्या गर्जने सारखा आहे. आणि हे सियोन कन्ये, लढाईसाठी सिद्ध झालेल्या पुरूषांप्रमाणे विशिष्ट रचना करूण ते घोड्यांवरून स्वारी करतात.”

“मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, आणि ते त्यांच्या गुलामांसाठी लूट होतील तेव्हा तुम्हास कळेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे.”