TSK

TSK · यश 10:9

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल, एरक, अक्काद व कालने ही होती.

तेव्हा अश्शूरच्या राजाने आहाजाचे ऐकले आणि दिमिष्कावर स्वारी करून ते काबीज केले आणि तेथील लोकांस त्याने कीर येथे पकडून नेले. रसीन यालाही त्याने ठार केले.

¶ अश्शूरच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ आणि सफरवाईम येथून लोक आणून शोमरोनात इस्राएली लोकांच्या ठिकाणी वसवले. या लोकांनी शोमरोनचा ताबा घेऊन त्यातील नगरात ते राहू लागले.

तीन वर्षांच्या अखेरीस त्याने ते घेतले. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या सहाव्या वर्षी हे झाले. अर्थातच इस्राएलचा राजा एलाचा मुलगा होशे याच्या नवव्या वर्षी त्यांनी शोमरोन घेतले.

कारण अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन आहे. पासष्ट वर्षांच्या आत एफ्राईम भंग पावेल व तेथील लोक एक राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.

राजमार्ग ओसाड पडले आहेत; तेथे कोणीही प्रवासी नाही. त्याने निर्बंध मोडला आहे, साक्षीदारांसह तुच्छ लेखले, आणि नगरांचा अनादर केला.

हमाथाचा राजा आणि अर्पदचा राजा सफरवाईम नगराचा राजा, हेनाचा व इव्वाचा राजा हे कोठे आहेत?

दिमिष्काविषयीः हमाथ व अर्पद लज्जित होतील, कारण त्यांनी अरिष्टाची बातमी ऐकली आहे. ते नाहीसे झाले आहेत! ते समुद्रासारखे खवळले आहेत, ते शांत होऊ शकत नाही.

“कालनेला जाऊन पाहा, तेथून महानगरी ‘हमाथला’ जा, तेथून पलिष्ट्यांची नगरी गथला खाली जा. ते तुमच्या दोन्ही राज्यांपेक्षा चांगले आहेत काय? त्यांची सीमा तुमच्या सीमेपेक्षा मोठी आहे काय?