TSK

TSK · यश 21:10

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

पण मीखाया म्हणाला, “नाही, कदापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगेन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.”

भाकरीसाठी धान्य दळतात, पण ते नीट दळले जात नाही. आणि जरी त्याच्या गाडीचे चाक व त्याचे घोडे ते विखरतात तरी तो ते दळीत नाही.

संदेष्ट्याला स्वप्न सांगायचे असेल, तर त्यास सांगू द्या. पण ज्या कोणाला मी काही घोषीत करतो, त्याने माझे वचन सत्याने सांगावे. गव्हा पुढे गवत ते काय? परमेश्वर असे म्हणतो.

“मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घरण्यावर पहारा देण्यासाठी नेमलेले आहे, म्हणून माझ्या तोंडचा शब्द ऐकून घे व त्यांना सावध कर!

परमेश्वर म्हणतो, “सियोनेच्या कन्ये, ऊठ आणि मळणी कर, मी तुला लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर करीन. तू पुष्कळ लोकांचा चुराडा करशील. मी त्यांची संपत्ती परमेश्वरास आणि त्यांचे धन जगाच्या प्रभूला समर्पित करीन.”

त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”