TSK

TSK · यश 3:24

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परमेश्वर तुम्हास रोग, ताप, सूज व बुरशी यांनी शिक्षा करील. उष्णता भयंकर वाढेल आणि अवर्षण पडेल. पिके होरपळून आणि कीड पडून करपून जातील. तुमचा नाश होईपर्यंत ही संकटे तुमच्या पाठीस लागतील.

¶ स्त्रियांसाठी केलेल्या नियमाप्रमाणे, बारा महिने झाल्यावर, अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी एकेका तरुणीला येत असे. तिला बारा महिने सौंदर्योपचार घ्यावे लागत. त्यापैकी सहा महिने गंधरसाच्या तेलाचे तर सहा महिने सुंगधी द्रव्ये आणि प्रसाधने यांचे उपचार होत असत.

मी आपले अंथरुण बोळ, अगरू, दालचिनी यांनी सुवासिक केली आहे.

ज्या वेळेस परमेश्वर सियोनेच्या कन्यांची अशुद्धता दूर करेल, आणि यरूशलेमेच्या गर्भातील रक्ताचे डाग त्याच्या न्यायाच्या आत्म्याने व ज्वलंत अग्नीच्या आत्म्याने स्वच्छ करील तेव्हा हे होईल.

ते आपल्या रस्त्यात गोणताट पांघरून आहेत; आपल्या घराच्या धाब्यावर आणि आपल्या चौकात प्रत्येकजण आक्रोश करीत आहेत, अश्रू गाळीत आहेत

तुम्ही ज्या निर्धास्तपणे राहणाऱ्या स्त्रियांनो उठा, आणि माझी वाणी ऐका; अहो निश्चिंत कन्यांनो, माझे ऐका.

म्हणून स्वत:ला गोणताट गुंडाळा, रडा आणि मोठ्याने आक्रोश करा. कारण परमेश्वराचा क्रोध आमच्यापासून मागे फिरला नाही.”

कारण प्रत्येक मस्तक टक्कल झाले आहे व प्रत्येक दाढी मुंडली आहेत. प्रत्येकाच्या हातावर जखमा आहेत व तागाची वस्त्रे त्यांच्या कमरेभोवती आहे.

सियोनेची वडीलधारी मंडळी भूमीवर बसून निमुटपणे आक्रंदन करीत आहे. त्यांनी आपल्या डोक्यात धूळ उडवली आहे. त्यांनी गोणताटाचे कपडे नेसले आहेत. यरूशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववित आहे.

ते तुझ्यासाठी डोक्याचे केस कापतील. गोणपाट नेसतील. मनात अति खिन्न होऊन तुजसाठी मोठ्याने विलाप करतील.

मी तुमचे उत्सव पालटून शोक असे करीन, आणि तुमची सर्व गाणी पालटून विलाप अशी करीन. मी प्रत्येकाला गोणताटाचे कपडे घालीन. मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन. ए कुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो, तसा मी करीन. तो फारच कडू शेवट असेल.”

तुमची शोभा ही केस गुंफणे, सोन्याची दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये;

लोक भयंकर उष्णतेने जळाले व त्यांनी या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा केली आणि त्यास गौरव द्यायला त्यांनी पश्चात्ताप केला नाही.