तेव्हा जी माणसे दावीदाबरोबर गेली होती त्यांच्यापैकी जी वाईट व दुष्ट होती. ती सर्व असे म्हणू लागली की, “ही माणसे आम्हाबरोबर आली नाहीत म्हणून जी लूट आम्ही सोडवली तिच्यातले काही आम्ही त्यांना देणार नाही; फक्त प्रत्येकाला ज्याची त्याची बायकापोरे मात्र देऊ. मग त्यांनी ती घेऊन निघून जावे.”
TSK
TSK · यश 33:23
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तेव्हा ते लोक अरामी छावणीकडे पळत सुटले आणि त्यांनी तेथील मौल्यवान चीजवस्तू पळवल्या. प्रत्येकाला भरपूर वस्तू मिळाल्या परमेश्वर म्हणाला होता तसेच झाले. लोकांस एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज घेता आला.
सैन्यांचे राजे पळून जातात, ते पळून जातात, आणि घरी राहणारी स्री लूट वाटून घेते.
अरे विध्वंसका, जो तुझा नाश झाला नाही! अरे विश्वासघातक्या, जो तुझा त्यांनी विश्वासघात केला नाही, तुला धिक्कार असो! जेव्हा तू विध्वंस करणे थांबवशील तेव्हा तू नाश पावशील, जेव्हा तू विश्वासघातकीपणा सोडशील, तेव्हा ते तुझा विश्वासघात करतील.
त्या जागी वैभवी परमेश्वर आपल्या समवेत असेल, ती जागा रूंद नदी व प्रवाहांची अशी होईल. त्यामध्ये वल्हेकऱ्यांच्या युद्ध नौका आणि मोठे जहाज त्यातून प्रवास करणार नाहीत.
¶ तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली.
म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले, त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या, नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीड वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले.