जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, त्यास मी देवाचे तारण दाखवेन.
TSK
TSK · यश 43:7
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या. त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत. आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत.
तर आता हे याकोबा, ज्या कोणी तुला उत्पन्न केले आणि हे इस्राएला, ज्या कोणी तुला घडवले, तो परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नकोस, कारण मी तुला खंडणी भरून सोडवले आहे; मी तुला नाव घेऊन बोलावले आहे, तू माझा आहेस.
माझ्यासाठी, माझ्यासाठीच, मी हे करेन, कारण मी माझ्या नावाचा अनादर कसा होऊ देऊ? मी माझे वैभव दुसऱ्याला देणार नाही.
“तुझे सर्व लोक नितीमान असतील, आणि माझा महिमा व्हावा म्हणून मी लावलेले रोप, माझ्या हाताचे कृत्य असे ते सर्वकाळपर्यंत भूमी वतन करून घेतील.”
त्या लोकांसारखे आम्ही झालो, ज्यांच्यावर तू कधीच राज्य केले नाही आणि ज्याना तुझे नाव दिले गेले नाही.
त्या दिवसात यहूदाचे तारण होईल आणि यरूशलेम सुरक्षित राहील. कारण तिला परमेश्वर आमची धार्मिकता आहे या नावाने बोलवतील.
हे प्रभू, ऐक, हे प्रभू, क्षमा कर, हे प्रभू, कान दे, आणि कार्य कर, उशीर करू नको; हे माझ्या देवा, तू आपणाकरता असे कर, कारण तुझ्या नगराला व तुझ्या लोकांस तुझे नाव आहे.
‹तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.›
आणि गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
कारण सुंता होण्यात किंवा सुंता न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय.
ह्यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती यहूदी आमच्याकडून व्हावी, ज्याच्यावर आम्ही आधीच आशा ठेवली.
कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जी ख्रिस्तामध्ये आहे जेणेकरूण आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते.
आणि तुम्हास जे उत्तम नाव ख्रिस्तात मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना?
जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताद्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे, त्यास गौरव व पराक्रम ही युगानुयुग असोत. आमेन.
‹जो विजय मिळवतो त्यास मी माझ्या देवाच्या भवनाचा खांब बनवीन आणि तो कधीही बाहेर जाणार नाही, मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवापासून स्वर्गातून उतरणारे नवे यरूशलेम, म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन.›