TSK

TSK · यश 53:6

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली; त्याने स्वतःच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला. आणि ते दोघे बरोबर निघाले.

विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही अधिक आहेत; जे अन्यायाने माझे वैरी असून मला कापून काढायला पाहतात ते बलवान आहेत; जे मी चोरले नव्हते, ते मला परत करावे लागले.

तरी परमेश्वराची इच्छा होती त्यास जखमी अवस्थेत ठेचावे; जर तुम्ही लोक त्याचे जीवन पापार्पण करता, तो त्याची संतती पाहील, तो आपले दिवस दीर्घ करील आणि परमेश्वराचा उद्देश त्याच्याद्वारे परिपूर्ण होईल.

त्या कुत्र्यांची भूक मोठी आहे; त्यांना कधीच पुरेसे मिळत नाही; ते विवेकहीन मेंढपाळ आहेत; ते सर्व आपापल्या मार्गाकडे, प्रत्येकजण लोभाने अन्यायी मिळकतीकडे वळले आहेत.

¶ माझे लोक हरवलेला कळप असे झाले आहेत. त्यांच्या मेंढपाळांनी त्यांना डोंगरात भटकविले आहे. त्यांनी त्यांना टेकड्या टेकड्यांतून फिरवले आहे. ते गेले, ते कोठे राहत होते ती जागा ते विसरले.

¶ ‹जर एखाद्या मनुष्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो नव्याण्णव मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरू शोधायला जाईल की नाही?›

पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही.

तो त्याचा जीव मरणापासून तारील व पापांची रास झाकील.

कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मरण पावला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.