माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली, त्यांना रुजवले त्यांना जागोजागी भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले.
TSK
TSK · यश 60:21
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो, आणि त्यांचे वतन सदैव राहील.
नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील.
¶ यानंतर जो कोणी सियोनात राहील, जो कोणी यरूशलेमेत बाकी राहील, प्रत्येक जण जो कोणी येरुशलेमेत जिवंत असा गणला जाईल त्यास पवित्र असे म्हणतील,
पण जेव्हा तो त्याची सर्व मुले पाहील, जे माझ्या हातचे कार्य असेल, ते माझे नाव पवित्र मानतील. ते याकोबाचा पवित्र प्रभूला पवित्र मानतील; इस्राएलाच्या देवाचा आदर करतील.
या लोकांस मी आपल्यासाठी निर्मिले, त्यांनी माझी स्तुतिस्तोत्रे कथन करावी.
इस्राएलाचा पवित्र प्रभू, तिचा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणत आहे, येणाऱ्या गोष्टीविषयी मला कोण विचारणार, तुम्ही माझ्या मुलांविषयी प्रश्न कराल का? तुझ्या हातच्या कामाबद्दल काय करायचे ते मला सांग?
अब्राहामाकडे पाहा जो तुमचा पूर्वज आहे आणि जिने तुम्हास जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पाहा. कारण जेव्हा मी त्याला बोलावले तेव्हा तो एकटाच होता. मी त्यास बोलावले, मी त्यास आशीर्वाद दिला आणि त्याचे पुष्कळ केले.”
तुझ्याविरुध्द तयार केलेले कोणतेही हत्यार सफल होणार नाही; आणि तुजवर आरोप ठेवणाऱ्या प्रत्येकास दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आणि माझ्यापासून त्यांचे समर्थन आहे.” हे परमेश्वराचे म्हणणे आहे.
सियोनेच्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ऐवजी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची वृक्षे, परमेश्वराने लावलेले असे म्हणतील.
यापुढे तुला “त्यागलेली” असे म्हणणार नाहीत, किंवा तुझ्या भूमीला “भयाण” असेही म्हणणार नाही. खरच तुला “माझा आनंद तिच्या ठायी आहे” असे म्हणतील, आणि तुझ्या भूमीला “विवाहित” म्हणतील. कारण परमेश्वराचा आनंद तुझ्यामध्ये आहे, आणि तुझी भूमी विवाहित होईल.
मी आपले डोळे त्यांच्या चांगल्या करीता लावेन आणि त्यांना या देशात प्रस्थापीत करीन. मी त्यांना खाली पाडणार नाही तर त्यांना बांधीन, मी त्यांना लावीन व उपटनार नाही.
म्हणून परमेश्वर देव असे म्हणतो, जेथून तुम्ही विखुरले गेलात त्याच ठिकाणी आणून तुम्हास एकत्र करीन आणि मी इस्राएल देश तुम्हास देईन.
मी त्यांना त्यांच्या देशात रुजवीन आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पुन्हा उपटले जाणार नाहीत. परमेश्वर तुझा देव असे म्हणतो.
“इस्राएलमधील उरलेले वाईट कृत्ये करणार नाहीत व खोटे बोलणार नाहीत. त्यांच्या मुखात कपटी जीभ आढळणार नाही. ते चरुन आडवे पडून राहतील व त्यांना कोणीही त्रास देणार नाही.”
‹‘जे सौम्य’ ते धन्य आहेत, › ‹कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’›
‹माझ्यातील, फळ न देणारा, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणार्या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्यास साफसूफ करतो.›
ह्यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती यहूदी आमच्याकडून व्हावी, ज्याच्यावर आम्ही आधीच आशा ठेवली.
कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जी ख्रिस्तामध्ये आहे जेणेकरूण आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते.
तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व राहते, असे नवे आकाश व नवे पृथ्वी त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.
जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.