TSK

TSK · यश 65:1

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील. सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील.

त्यादिवशी, इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज निशानी असे उभे होईल. राष्ट्रे त्यास शोधून काढतील, आणि त्याचे विश्रामस्थान वैभवशाली होईल.

मी सियोनेला प्रथम म्हणालो, पाहा, ते येथे आहेत; मी यरूशलेमेकडे अग्रदूत पाठविला आहे.

अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा आणि तारण पावा; कारण मी देव आहे, आणि माझ्याशिवाय दुसरा देव नाही.

त्या लोकांसारखे आम्ही झालो, ज्यांच्यावर तू कधीच राज्य केले नाही आणि ज्याना तुझे नाव दिले गेले नाही.

त्यानंतर त्या दिवसात पुष्कळ राष्ट्रे परमेश्वराकडे येऊन त्यास मिळतील. तो म्हणतो, “तेव्हा तुम्ही माझी प्रजा व्हाल; कारण मी तुम्हामध्ये वस्ती करीन.” आणि मग तुला समजेल की मला तुझ्याकडे सेनाधीश परमेश्वराने पाठवले आहे.

येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, ‹“मुली, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस.”›

त्याने ज्यांना केवळ यहूद्यांमधून नाही, पण परराष्ट्रीयामधूनही बोलावले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत.

¶ पण यशया फार धीट होऊन म्हणतो की, ‘ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो आहे, ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही त्यांना प्राप्त झालो आहे.’

ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता पण आता देवाचे लोक आहात; तुमच्यावर दया केली नव्हती पण आता दया केली गेली आहे.