अरामाचा राजा रसीन याने यावेळी एलाथ हा भूभाग परत मिळवला आणि तेथून त्याने सर्व यहूद्यांना हुसकावून लावले. मग अरामी लोक एलाथात स्थायिक झाले आणि अजूनही त्यांची तिथे वस्ती आहे.
TSK
TSK · यश 9:12
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
कारण त्यांनी याकोबाला खाऊन टाकले आहे, आणि त्यांनी त्याच्या खेड्यांचा नाश केला आहे.
म्हणून परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे, आणि त्याने आपला हात, त्यांच्यावर उगारून त्यांना शिक्षा केली आहे. डोंगरसुध्दा भीतीने कापले आहेत आणि त्यांची मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडली आहेत. हे सर्व असूनही देवाचा राग शांत झाला नाही, पण त्याचा हात लोकांस शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.
मनश्शे एफ्राईम फस्त करील, आणि एफ्राईम मनश्शेला; आणि दोघे मिळून यहूदावर चढाई करतील. कारण हे सर्व होऊनही परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही, परंतु मारण्यासाठी अजूनही त्याच्या हात उगारलेला राहील.
जे कोणी मदतीसाठी खाली मिसरमध्ये जातात आपल्या घोड्यांवर अवलंबून राहतात त्यांना हायहाय, आणि रथांवर (कारण ते पुष्कळ आहेत) आणि घोडस्वारांवर (कारण ते अगणित आहेत) भरवसा ठेवतात. परंतु ते परमेश्वराचा शोध घेत नाहीत किंवा ते इस्राएलाचा जो पवित्र त्याकडे लक्ष देत नाही!
जे राष्ट्र तुला ओळखत नाही आणि जे कुटुंब तुझ्या नामाचा धावा करत नाही, त्यावर तू आपला क्रोध ओत. कारण त्यांनी याकोबाचा विनाश केला आहे आणि त्यास खाऊन टाकले आहे, त्यांनी त्यास क्षीण केले आहे. त्याची वस्ती ओसाड केली आहे.
पण जेव्हा बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने देशावर हल्ला केल्यावर, आम्ही म्हणालो, खास्द्यांच्या व अराम्यांच्या सैन्यापासून आपण यरूशलेमेला निसटून जाऊ. म्हणून आम्ही यरूशलेमेमध्ये राहत आहोत.”
“मी तुम्हास तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली आणि तुमच्या सर्व स्थानांत भाकरीचा तोटा दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.” असे परमेश्वर म्हणतो.
“मी तुम्हास तांबेऱ्याने व भेरडाने पीडले आहे. टोळांनी तुमच्या बागांचा, व द्राक्षमळ्यांचा, व अंजिराच्या व जैतूनाच्या झाडांना फार खाऊन टाकले. तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
“सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला. तसाच मी तुमच्यातील कित्येक शहरांचा नाश केला; आगीत पटकन ओढून काढलेल्या जळक्या काटकीप्रमाणे तुमची स्थिती होती. तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
तिने परमेश्वराचे वचन ऐकले नाही व त्याची शिकवणही ग्रहण केली नाही. तीने परमेश्वरावर भरवसा ठेवला नाही व ती तिच्या देवाला शरणही गेली नाही.