तसे वागलात तर तुमच्या भूमीवर मी योग्यवेळी पाऊस पाडीन. म्हणजे तुम्हास धान्य, नवीन द्राक्षरस, तेल यांचा साठा करता येईल.
TSK
TSK · याको 5:7
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
चला आपण परमेश्वरास ओळखू या, प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळवूया, तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे, भूमीवर पाऊस पडतो, त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.”
वीज व वादळवारा निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे वळवाच्या पावसासाठी प्रार्थना करा आणि तो त्यांच्यासाठी पावसाची वृष्टी करील, मानव व जमिनीवरील पिकांसाठी तो ती करील.
‹या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.›
‹मी तुम्हास सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील, तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्यास पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”›
म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच;
कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणार्या उत्तेजनाने आशा धरावी.
उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात;
आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी कापणी करू.
आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेली सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
ह्यासाठी की, आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी.
¶ म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.
त्याच्या येण्याचे वचन कोठे आहे? कारण पूर्वज निजले तेव्हापासून सर्व गोष्टी जश्या उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.