TSK

TSK · यिर्म 14:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तेव्हा मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू तू यहूदातील आणि यरूशलेममधील लोकांस खरोखरच युक्तीने फसविलेस. ‘तू त्यांना म्हणालास की तुम्हास शांती मिळेल.’ तलवार तर जिवापर्यंत पोचली आहे.”

भविष्यवादी खोटेपणाने भविष्य सांगतात, आणि याजक त्यांच्या शक्तीने अधिकार गाजवतात. ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांस हे प्रिय आहे! पण शेवटी काय होणार?”

काही शांती नसता ही, शांती, शांती, असे बोलून त्यांनी माझ्या लोकांच्या कन्येचे घाय वरवर बरे केले आहे.

माझा अपमान करणाऱ्यांना ते सतत बोलत राहतात की, परमेश्वराने तुम्हास शांती देऊ केली आहे, आणि प्रत्येकजण आपल्या हृदयाच्या हट्टीपणाच्या वाटेने चालतात आणि म्हणतात, तुमच्यावर कोणतीच आपत्ती येणार नाही.

तुझे संदेष्टे कोठे आहेत, ज्यांनी तुला भविष्य सांगितले आणि म्हणाले बाबेलचा राजा तुम्हावर किंवा या देशाविरूद्ध येणार नाही?

किंबहूना ज्या देवभीरुला मी खेदीत केले नाही. त्याचे हृदय असत्य बोलून दुःख देता व वाईट मार्गापासून परावृत होऊ नये, आणि आपल्या जीवाचा बचाव करु नये असे त्यांच्या बाहूंना बळ देता.

¶ पण त्या लोकात खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील.