¶ तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू बघशील; मी माझे बाहुबल त्यास दाखवले म्हणजे मग तो माझ्या लोकांस जाऊ देईल. कारण माझ्या बाहुबलामुळे तो त्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.”
TSK
TSK · यिर्म 32:21
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
हे चिन्ह तुझ्या हातावर, तुझ्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये स्मारक असे असावे, परमेश्वराचा नियम तुझ्या मुखी असावा. कारण की परमेश्वराने बलवान भुजाने तुला मिसर देशामधून बाहेर आणले.
दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या देवाने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने मिसर देशात तुमच्यासाठी महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वत: पाहिले, त्याने तुमच्यासाठी संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी हात आणि उगारलेला भूज ह्याद्ववारे भयप्रद कार्ये केली.
मग परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास मिसरमधून बाहेर आणले. तेव्हा त्याने मोठ्या भयानकपणाने चमत्कार व चिन्ह प्रताप दाखवले आणि उत्पात घडवले.
कारण तुझे महान नाव बलशाली हात व पुढे केलेला बाहू ही सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच, व त्यांनी या मंदिराकडे येऊन प्रार्थना केली,
हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे?
त्याने आपल्या लोकांस आनंद करीत, त्याच्या निवडलेल्यांना विजयोत्सव करीत बाहेर आणले.
आणि ज्याने इस्राएलाला त्यांच्यामधून बाहेर काढले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.