¶ तेव्हा ते लोक म्हणाले, “या आपण यिर्मयाविरूद्ध योजना करु, कारण याजकापासून नियमशास्त्र, ज्ञानी लोकांकडून सल्ला, आणि संदेष्ट्यांपासून येणारे वचन हे नष्ट होणार नाहीत. चला आपण त्यास शब्दांचा मारा देऊ, आणि तो सांगत असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष देऊ नाही.”
TSK
TSK · यिर्म 37:13
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
जो या शहरात राहील तो तलवार, उपासमारीने व भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी बाहेर तुम्हास वेढा घातलेल्या खास्द्यांकडे पार निघून जाईल तो वाचेल, आणि त्याचा जीव त्यास लूट असा होईल.
¶ म्हणून मी यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याशी बोललो आणि त्यास हा संदेश दिला. “तुम्ही आपल्या माना बाबेलाच्या राजाच्या जोखडात द्या आणि त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा म्हणजे तुम्ही जगाल.
तो खाली राजाच्या घरात चिटणीसाच्या खोलीत गेला. तेव्हा पाहा, सर्व अधिकारी, लेखक अलीशामा, शमायाचा मुलगा दलाया, अखबोरचा मुलगा एलनाथान, शाफानाचा मुलगा गमऱ्या व हनन्याचा मुलगा सिद्कीया आणि सर्व वरिष्ठ अधिकारी तेथे बसले होते.
¶ म्हणून अधिकारी राजाला म्हणाले, या मनुष्यास ठार मारावे, कारण याप्रकारे नगरात उरलेल्या लढणाऱ्या मनुष्यांचे आणि सर्व लोकांचे हात दुर्बल करतो. कारण तो ही वचने सांगून, मनुष्यांचे संरक्षण करत नाही पण अरिष्ट करायला पाहतो.
¶ नंतर एबद-मलेख कुशीला राजाने आज्ञा दिली. तो म्हणाला, “येथून तीस माणसे बरोबर घे आणि यिर्मया संदेष्टा मरण्यापूर्वी त्यास पाण्याच्या टाकीतून बाहेर काढ.”
¶ बेथेल येथील याजक अमस्या ह्याने, “इस्राएलाचा राजा, यराबामाला निरोप पाठविला. आमोसाने इस्राएलाच्या घरामध्ये तुझ्याविरुध्द कट केला आहे. त्याचे सर्व शब्द देशाला सहन करवत नाही.
व ते त्याच्यावर आरोप करू लागले. ते म्हणाले, “आम्ही या मनुष्यास लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वतः ख्रिस्त, एक राजा आहे.”
हा मनुष्य म्हणजे एक पिडा आहे असे आम्हास आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकात हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.
गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्या आणि तरी खरे आहोत,