तुमचा देव परमेश्वर याचे भय धरा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने वाहू नका.
TSK
TSK · यिर्म 4:2
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
मग दावीद शपथ वाहून म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हे तुझा बाप खचित जाणतो; म्हणून तो म्हणतो, हे योनाथानाला कळू नये कळले तर त्यास दुःख होईल; परंतु खरोखर परमेश्वर जिवंत आहे व तुझा जीव जिवंत आहे माझा जीव मरणापासून केवळ पावलांच्या अंतरावर आहे.”
राजाचे नाव सर्वकाळ टिकून राहो; सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नाव पुढे चालू राहो; त्याच्यात लोक आशीर्वादित होतील; सर्व राष्ट्रे त्यास धन्य म्हणतील.
मी आपली शपथ वाहीली आहे, न्यायीपणाच्या माझ्या मुखातून वचन निघाले आहे, ते मागे फिरणार नाही आणि ते असे की माझ्यापुढे प्रत्येक गुडघा वाकेल. प्रत्येक जीभ माझ्यापुढे शपथ वाहील.
¶ जे तुम्ही इस्राएलाच्या नावाने ओळखले जाता, आणि जे तुम्ही यहूदाच्या शुक्राणातून जन्मले आहा, याकोबाच्या घराण्या, हे ऐक. जे तुम्ही परमेश्वराच्या नावाची शपथ वाहता आणि इस्राएलाच्या देवाला विनंती करता, पण हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करीत नाही.
परमेश्वर जिवंत आहे, जरी ते असे म्हणतात ती ते खोटी शपथ वाहत आहेत.”
असे होईल की जशी त्यांनी माझ्या लोकांस बालमूर्तीची शपथ वाहायला शिकवली तशी, परमेश्वर जिवंत आहे, अशी माझ्या नावाची शपथ वाहायला जर ते माझ्या लोकांचे मार्ग मन लावून शिकतील तर ते माझ्या लोकांमध्ये बांधण्यात येतील.
मी त्यांना घेऊन येईन आणि ते यरूशलेमेमध्ये राहतील. ते सत्याने व धर्माने पुन्हा माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.”
यासाठी की नियमशास्त्रात असे लिहिले आहे, “जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी बाळगावा.”
आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने, अब्राहामाला पूर्वीच शुभवर्तमान सांगितले की, ‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.’