जो या शहरात राहील तो तलवार, उपासमारीने व भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी बाहेर तुम्हास वेढा घातलेल्या खास्द्यांकडे पार निघून जाईल तो वाचेल, आणि त्याचा जीव त्यास लूट असा होईल.
TSK
TSK · यिर्म 44:13
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
मी त्यांच्याविरुद्ध तलवार, दुष्काळ आणि रोगराई पाठवीन, मी त्यांना आणि त्याच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर ते अजिबात शिल्लक राहणार नाहीत असे करीन.”
तर ज्या तलवारीची तुम्हास भीती वाटते, ती मिसर देशात तुम्हास गाठेल. ज्या दुष्काळाची तुम्ही काळजी करीता, तो मिसरात तुमचा पाठलाग करील. आणि तुम्ही तेथे मराल.
¶ कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, जसा माझा क्रोध व माझा संताप यरूशलेमेवरचा माझा राग व्यक्त करून दाखविला. यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर ओतला आहे तसा माझा क्रोध जर तुम्ही मिसरमध्ये जाल तेव्हा तुम्हावर ओतला जाईल. तुम्ही शापाची वस्तू व्हाल व भयचकीत, शाप बोलण्याचा विषय आणि काहीतरी निंदनीय व्हाल. आणि हे ठिकाण तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही.
पाहा, मी त्यांच्या चांगल्यासाठी नाही तर त्यांच्या अनिष्टासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. यहूदा देशातला जो प्रत्येक व्यक्ती मिसर देशामध्ये आहे त्यांचा अंत होईपर्यंत ते तलवारीने नाश होईल.