TSK

TSK · ईयो 34:21

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

अखिल पृथ्वीवर परमेश्वराचे नेत्र निरीक्षण करीत असतात जे कोणी सरळ मनाने त्याच्याशी वर्ततात अशांना तो आपले पाठबळ देतो. पण तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.”

देव माझे सर्व मार्ग पाहत नाही का? आणि माझे सर्व पाऊल मोजत नाही का?

हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण; माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.

परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात, ते चांगले आणि वाईट पाहत असतात.

मी प्रत्येक मनुष्यास त्याच्या लायकीप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे ताडना करण्यास, मी परमेश्वर, मनाचा शोध घेतो, मी हृदय पारखतो.

पाहा, प्रभू परमेश्वराचे डोळे पापी राज्यावर आहे, आणि मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन, पण याकोबाच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही.