TSK

TSK · योहा 1:17

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व स्त्रीच्या बीजामध्ये मी शत्रूत्व ठेवीन. तो तुझे डोके ठेचील आणि तू त्याची टाच फोडशील.”

¶ देवाने ही सर्व वचने सांगितली,

¶ मोशेने सर्व इस्राएल लोकांस एकत्र बोलवून सांगितले, “इस्राएल लोकहो, आज मी जे विधी आणि नियम सांगतो ते ऐका. तुम्ही ते शिका आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करा.

दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.

त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.

दयेपोटी त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.

¶ शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते.

‹मोशेने तुम्हास नियमशास्त्र दिले की नाही? तर तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला ठार मारायला का पाहता?”›

देव मोशेबरोबर बोलला हे आम्हास माहीत आहे. हा कोठला आहे हे आम्हास माहीत नाही.”

रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली.

¶ तेव्हा यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले, तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली, मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला, हे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता.

शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली.

कारण मी म्हणतो की, ख्रिस्त देवाच्या सत्याकरता सुंता झालेल्यांचा सेवक झाला; म्हणजे पूर्वजांना दिलेल्या त्याच्या वचनांचे त्याने त्यांना प्रमाण द्यावे,

¶ पण दगडावर कोरलेल्या अक्षरात लिहिलेली मरणाची सेवा इतकी गौरवी झाली की, इस्राएल लोक मोशेच्या तोंडावरील तेज, जे नाहीसे होत चालले होते, त्या तेजामुळे त्याच्या तोंडाकडे दृष्टी लाववत नव्हती.

आणि, मी हे म्हणतो की, देवाने तो करार आधीच स्थापल्यावर चारशेतीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द करू होत नाही.

¶ परंतु देवाला लोकांमध्ये दोष आढळला. तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर नवा करार करीन.

कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे अशक्य आहे.

¶ आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना होत्या.