मग दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक आपल्या बापाची मेंढरे राखत होता, तेव्हा एक सिंह व एक अस्वल यांनी येऊन एक मेंढरू कळपातून नेले.
TSK
TSK · योहा 10:11
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही.
मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपास तो चारील, तो कोकरास आपल्या बाहूत एकवटून त्यांना आपल्या उराशी धरून वाहील आणि तान्ह्या पिल्लांना पाजणाऱ्या मेंढ्याना तो जपून नेईल.
कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी स्वत:च आपल्या कळपाचा शोध घेईन आणि मी त्यांची काळजी घेईन,
¶ दावीद माझा सेवक त्यांच्यावर राजा होईल. त्या सर्वांवर एकच मेंढपाळ असेल, आणि ते माझ्या निर्णयानुसार चालतील आणि माझे नियम राखून ठेवतील व त्याचे पालन करतील.
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे तलवारी, माझ्या मेंढपाळांवर प्रहार कर व माझ्या मित्रावर वार कर; मेंढपाळावर वार कर म्हणजे मेंढरे पळून जातील आणि मी त्या लहान जीवांना शिक्षा करीन.
‹मी उत्तम मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो.›
‹आपल्या मित्रांसाठी आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.›
आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत.
¶ त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, ह्यासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्त्वाला जिवंत रहावे; त्यास बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात.
ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपणदेखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे.