TSK

TSK · योहा 17:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तेव्हा मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा मोठा आनंद आहे, त्याकडे जाईल, आणि हे देवा, माझ्या देवा, वीणा वाजवून मी तुझी स्तुती करीन.

ज्याला वधू आहे तो वर आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे बोलणे ऐकतो, त्यास वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.

‹माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी हे तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत.›

‹माझ्याठायी तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हास क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाच्या शक्तीला जिकले आहे.”›

कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.

जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.

¶ मला जरी अनेक गोष्टी तुम्हास लिहायच्या आहेत तरी त्या तुम्हास मी शाई व लेखणीने लिहू इच्छित नाही. तर त्याऐवजी तुम्हास भेटावे व प्रत्यक्ष सर्वकाही बोलावे अशी आशा मनात बाळगून आहे. म्हणजे आपला आनंद त्यामुळे परिपूर्ण होईल.