TSK

TSK · योहा 2:19

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

‹कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.›

म्हणू लागले, हे परमेश्वराचे भवन मोडून तीन दिवसात परत उभारणाऱ्या, स्वतःला वाचव जर तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये.

¶ तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी. वडील, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्यास जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे.

¶ जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, अरे! परमेश्वराचे भवन पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना!

‹मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.›

त्यास देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.

आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जिवे मारले; त्यास देवाने मरण पावलेल्यामधून उठवले याचे आम्ही साक्षी आहोत.

पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ज्याने मरण पावलेल्यातून उठवले त्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर तो ते आपल्याही हिशोबी गणले जाणार आहे.

पण ज्याने येशूला मरण पावलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मरण पावलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणार्‍या, आपल्या आत्म्याच्याद्वारे तुमचीही मरणाधीन शरीरे जिवंत करील.

¶ पण जर आम्ही ख्रिस्त मरण पावलेल्यातून उठविला गेला आहे असे शुभवर्तमान गाजवतो, तर मृतांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यातील काहीजण म्हणतात हे कसे?

कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मरण पावला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.