तेव्हा परमेश्वराने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही.
TSK
TSK · योना 1:4
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
परंतु तू त्यांच्यावर आपला फुंकर वायू सोडलास आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले; ते शिशाप्रमाणे समुद्रात खोल पाण्यात तळापर्यंत बुडाले.
काही जहाजातून समुद्र प्रवास करतात, आणि महासागरापार व्यवसाय करतात.
तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो; आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.
कारण पाहा, जो पर्वत निर्माण करतो व वारा अस्तित्वांत आणतो, आणि मनुष्यास त्याची कल्पना काय ती प्रगट करतो, जो पाहाटे अंधार करतो, आणि पृथ्वीच्या उंच स्थानांवर चालतो. त्याचे नाव परमेश्वर, सेनाधीश देव आहे.”
¶ तेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारू हाकारीत जाऊ लागले, जहाजावरच्या लोकांस वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हास पाहिजे होते व तसेच ते वाहत आहे.