TSK

TSK · विला 2:11

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तेव्हा दावीद व त्याच्याजवळचे लोक हेल काढून इतके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही.

शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.

परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी दु:खात आहे. माझे डोळे, माझा जीव, माझ्या देहासह क्षीण झाला आहे.

यास्तव मी म्हणालो, माझ्याकडे पाहू नका, मी कष्टाने रडेन, माझ्या लोकांच्या मुलीच्या नाशाबद्दल माझे सांत्वन करु नका.

तुझी मुले दुबळे होऊन प्रत्येक चौकात पडले आहेत, जणू काय जाळ्यात पकडलेले काळवीट होय. परमेश्वराने रागाने आणि तुझ्या देवाच्या धमकीने ते भरून गेले आहेत.

पाहा! माझ्या लोकांच्या कन्येचा रडण्याचा आवाज फार दूर असलेल्या देशातून येतो. “परमेश्वर सियोनात नाही काय? किंवा तिचा राजा तिच्यामध्ये नाही काय?” मग त्यांनी आपल्या कोरलेल्या प्रतिमांनी आणि निरुपयोगी मूर्तींनी मला का क्रोध आणला आहे.

¶ म्हणून आता, सेनाधीश परमेश्वर आणि इस्राएलाचा देव असे म्हणतो, “तुम्ही आपल्या स्वत:विरूद्ध हे मोठे अनिष्ट का करता? तुम्ही आपणासाठी पुरुष व स्त्रिया, मुले व बालके यांना यहूदापासून तोडण्याचे कारण का होता? तुमचा अवशेष उरणार नाही.

या सगळयाबद्दल मी आक्रोश करते; माझ्या डोळयांतून अश्रू पाण्याप्रमाणे वाहात आहेत. कारण माझे सांत्वन करणारा माझ्यापासून दूर आहे. माझी मुले खिन्न झाली आहेत, कारण शत्रूचा विजय झाला आहे.”

रात्रीच उठून मोठ्याने आक्रोश कर. परमेश्वराच्या मुखापुढे आपले मन पाण्यासारखे ओता. जी तुझी मुले उपासमारीने नगराच्या रस्त्या-रस्त्यावर बेशूध्द होत आहेत, त्यांच्या जीवा करता तू आपले हात वर कर.

कोल्ही आपल्या पिलांना स्तनांजवळ घेऊन दुध पाजतात. पण माझ्या लोकांची कन्या वाळवंटात राहणाऱ्या शहामृगाप्रमाणे निर्दयी झाली आहे.

जे उपासमारीने मरण पावले त्यांच्यापेक्षा जे तलवारीने मरण पावले त्यांचे बरे झाले आहे. कारण उपासमार झालेले फारच दु:खी होते. ते व्याकुळ झाले होते. शेतामधून काहीच न मिळाल्यामुळे ते मरण पावले.