TSK

TSK · विला 3:39

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ काइन परमेश्वरास म्हणाला, “माझी शिक्षा मी सहन करण्यापलीकडे, इतकी मोठी ती आहे.

¶ त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि ओस असेपर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; त्यांनी माझे विधी मानण्यास नकार दिला व माझे नियम तुच्छ लेखले म्हणूनच त्यांना त्यांच्या पापाचा दंड भरावा लागेल.

¶ दुसऱ्या दिवशी इस्राएलच्या सर्व लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रार केली. ते म्हणाले, तुम्ही परमेश्वराची माणसे मारली.

यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्राएलाचे वडील संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे आपल्या डोक्यात धूळ घालून आणि पालथे पडून राहिले.

¶ अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “तुझे माझे काय आहे? तू आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” तेव्हा इस्राएलाच्या राजा अलीशाला म्हणाला, “नाही, कारण परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले, ह्यासाठी की मवाबाकडून आम्ही पराभूत व्हावे.”

अलीशा हे बोलत असातानाच दूत त्याच्याजवळ आला. त्याने निरोप दिला “हे संकट परमेश्वराकडूनच आले आहे. आता मी त्याची आणखी वाट कशासाठी पाहावी?”

तो (देव) तुला ज्ञानाचे रहस्य दाखवितो! चातुराईत तो (देव) महान आहे. तुझ्या अन्यायाच्या मानाने तुला जेवढी शिक्षा करायला हवी तेवढी तो करत नाही हे तू समजावे.

मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो, आणि त्याचे मन परमेश्वराविरूद्ध संतापते.

तुझी मुले दुबळे होऊन प्रत्येक चौकात पडले आहेत, जणू काय जाळ्यात पकडलेले काळवीट होय. परमेश्वराने रागाने आणि तुझ्या देवाच्या धमकीने ते भरून गेले आहेत.

तुझ्या जखमेमुळे तू मदतीसाठी का ओरडतो? तुझ्या यातना बऱ्या न होऊ शकणाऱ्या आहेत. कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे, तुझ्या असंख्य पापामुळे मी तुला या गोष्टी केल्या आहेत.

तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले, आणि प्रवाहाने मला वेढले, तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ माझ्यावरून गेला.

परमेश्वर माझा वाद करेल आणि माझा न्याय साधेल तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन, कारण मी त्याच्याविरुध्द पाप केले आहे. तो मला प्रकाशाकडे आणील, आणि त्याच्या न्यायीपणात त्याने मला सोडवलेले मी पाहीन.

लोक भयंकर उष्णतेने जळाले व त्यांनी या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा केली आणि त्यास गौरव द्यायला त्यांनी पश्चात्ताप केला नाही.