TSK

TSK · विला 4:17

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ जो कूश त्यांची आशा आणि जो मिसर देशाचे वैभव त्यामुळे ते हताश व लज्जित होतील.”

परमेश्वर असे म्हणतो, “बंडखोर मुलांना हायहाय हे. ते योजना करतात, त्या माझ्यापासून नाही; ते दुसऱ्या राष्ट्राबरोबर युती करतात, पण त्या माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने नाही, अशी ती पापाने पापाची भर घालतात.

तर आता, शिहोराचे पाणी पिण्यास मिसरच्या रस्त्यात तुला काय काम आहे? आणि फरात नदीचे पाणी पिण्यासाठी अश्शूराची वाट का धरावी?

आणि तू आपले हात आपल्या डोक्यावर घेऊन तेथूनही उदास अशी निघून जाशील. कारण ज्यांच्यावर तुझा भरवसा होता त्यांना परमेश्वराने नाकारले, म्हणून तुला त्यांच्याकडून काहीच मदत होणार नाही.

“परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, तुम्ही यहूदाच्या राजाला हे सांगा, कारण माझ्यापासून सल्ला घेण्यासाठी तुम्हास माझ्याकडे पाठविले आहे, पाहा, फारोचे सैन्य, तुम्हास मदत करण्यासाठी आले, त्यांना स्वतःच्या मिसर देशात परत जावे लागेल.

मी माझ्या प्रियकरांना हाका मारल्या, पण त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला. माझे याजक आणि वडील आपला जीव वाचावा म्हणून, स्वत:साठी अन्न शोधीत असता नगरात प्राण सोडले.

मग मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांस कळून येईल की मीच परमेश्वर आहे. कारण ते इस्राएलाच्या घराण्याला बोरूची काठी असे झाले आहेत.