TSK

TSK · लेवी 1:9

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा. हे परमेश्वराकरता होमार्पण होय. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय;

त्याचे पाय व आतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय.

मग त्याने ते अर्पण अहरोनाच्या याजक मुलांकडे आणावे; त्यांनी त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.

चोळून काढलेले दाणे व तेल ह्यापैकी काही व सर्व धूप ह्यांचा याजकाने स्मारकभाग म्हणून होम जाळावा; हे परमेश्वरासाठी अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.

मग याजकाने त्या सर्वाचा वेदीवर होम करावा; हे शांत्यर्पण अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण आहे.

त्याची आतडी पाय पाण्याने धुवून मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले. ते परमेश्वरासाठी सुवासिक हव्य झाले, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.

त्याने त्याची आतडी व पाय धुवून त्यांचाही वेदीवर होम केला.

¶ जेव्हा तू परमेश्वराकरता होमार्पण किंवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांत्यर्पणाचा यज्ञ म्हणून गोऱ्हा म्हणून अर्पण करावा.

दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे. जसे सकाळचे अन्नार्पणाप्रमाणे व त्याबरोबरची पेयार्पणे तसे ते परमेश्वरास मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेले अर्पण असे अर्पण कर.

याखेरीज शलमोनाने दहा तस्ते बनवली. ती त्याने या गंगाळाच्या उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला पाच अशी बसवली. होमार्पणात द्यावयाच्या वस्तू धुवून घेण्यासाठी ही दहा तस्ते होती. पण मुख्य पितळी गंगाळ मात्र याजकांच्या वापरासाठी, होते.

मी तुला मेंढ्याच्या धूपासहित पुष्ट पशूंचे होमार्पणे मी तुला अर्पीण; बोकड आणि गोऱ्हे अर्पीण.

मी आपले हाथ उंचावून शपथ घेऊन दिलेल्या देशात मी त्यांना आणिले, तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी आणि दाट छायेचे वृक्ष पाहून मला संतापावण्यासाठी तेथे त्यांनी यज्ञबली अर्पिली. तेथे त्यांनी सुवासीक धुप जाळीला व पेयार्पण अर्पिली.

द्वारापाशी खांबाला लागून एकएक खोली असून तिला दार होते. तेथे होमबलि धूत असत.

‹अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताट व वाट्या बाहेरून साफ करता पण ते आतून अपहार आणि असंयम यांनी त्या आतून भरल्या आहेत.›

आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.