TSK

TSK · लेवी 18:30

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली भयंकर अमंगळ कृत्ये करु नये.

¶ त्यांनी माझी आज्ञा पाळावी व पवित्र पदार्थ अपवित्र होणार नाहीत याची काळजी घ्यावी; त्यांनी ती घेतील नाही तर आज्ञाभंगाच्या पापामुळे ते मरतील. मी परमेश्वराने त्यांना या पवित्र कामासाठी वेगळे केले आहे.

एवढे झाल्यावर एक खबरदारी घ्या. त्यांचा पाडाव झाल्यावर तुम्हासच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल. आणि त्यांच्या देवांच्या भजनी लागाल. तेव्हा सावध राहा. त्यांच्या दैवतांच्या नादी लागू नका. या राष्ट्रानी ज्याप्रकारे सेवा केली तशीच मी आता करतो असे मनात आणू नका.

¶ तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या ठिकाणी राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रांतील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका.

परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही पुरुष वेश्या त्या देशात होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात यापूर्वी जे लोक राहत असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलाच्या लोकांस दिला होता.

¶ या सर्व गोष्टी झाल्यावर अधिकारी माझ्याकडे येऊन म्हणाले, “इस्राएल लोक, याजक आणि लेवी हे इतर देशाच्या लोकांपासून वेगळे राहत नसून व ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी आणि अमोरी यांच्याप्रमाणेच घृणास्पद कृत्ये करतात.