TSK

TSK · लेवी 19:11

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.

एखाद्याने आपले गाढव, बैल, किंवा मेंढरू थोडे दिवस सांभाळण्याकरता आपल्या शेजाऱ्याकडे दिले, परंतु ते जर मरण पावले, किंवा जखमी झाले किंवा कोणी पाहत नसताना पकडून नेले;

कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत; लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही.

“कारण त्यांच्यातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ते सर्व अप्रामाणिक मिळकतीचा लोभ धरतात. भविष्यवाद्यांपासून ते याजकापर्यंत, त्यांच्यातील प्रत्येकजण फसवे काम करतो.

कारण ते त्यांच्या जिभेने खोटे बाण सोडतात, पण ते या पृथ्वीवर विश्वासूपणात मोठे नाहीत. ते एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. ते मला ओळखत नाही, परमेश्वर असे म्हणातो.

¶ पण तुम्हास पुढील गोष्टी करणे भाग आहे! तुमच्या शेजाऱ्याला सत्य सांगा. आपल्या वेशीत शांती, न्याय व सत्याने न्याय करा. त्यामुळे शांतता येईल.

कधीच नाही! देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.’

¶ ‘म्हणून खोटे सोडून द्या. प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याबरोबर खरे तेच बोलावे कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत.

एकमेकांशी खोटे बोलू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसहित काढून टाकले आहे

पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.”