तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचा मान राखलाच पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे; मी तुमचा देव परमेश्वर आहे!
TSK
TSK · लेवी 19:31
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ जो मनुष्य व्यभिचारी मतीने सल्लामसलत विचारण्यास पंचाक्षऱ्याकडे व चेटक्याकडे जातो तो माझ्याशी विश्वासघात करीत आहे मी त्याच्या विरूद्ध होईन व त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
आपल्या पोटच्या मुलाबाळांचा वेदीवर बली देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, शकुनमुहर्त पाहणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.
मग शौल आपल्या चाकरांना म्हणाला, भूत जिच्या परिचयाचे आहे अशा एखाद्या स्त्रीचा माझ्यासाठी शोध करा, “म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिच्याजवळ विचारीन.” तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास म्हटले, “पाहा भूत जिच्या परिचयाचे आहे अशी एक स्त्री एन-दोर येथे आहे.”
आपल्या मुलाचाच बली देऊन मनश्शेने त्यास वेदीवर जाळले. जादूटोणा, मंत्रतंत्र, भूतवैद्य यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनश्शेला नाद होता. परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते ते मनश्शे करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला.
बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या पोटच्या पुत्रांचा यज्ञात बली दिला. जादूटोणा, चेटूक यातही तो पारंगत होता. चेटूक करणारे आणि मृतात्म्याशी संबंध ठेवणारे यांच्याशी मनश्शेचे संबंध होते. परमेश्वराने निषिध्द मानलेली बरीच कृत्ये मनश्शेने केली. त्याच्या या गैरवर्तनामुळे परमेश्वराचा संताप झाला.
तू नीच केली जाशील आणि भूमीवरून बोलशील. तुझा आवाज धुळीतून कमी निघतील, तुझा आवाज भूमीतून बाहेर निघणाऱ्या भूतासारखा असेल, आणि तुझा शब्द धुळीतून आल्याप्रमाणे येईल.
त्याने आपल्या जादूमुळे बराच काळपर्यंत लोकांस चकीत केले, असल्याने लोक त्याचे ऐकत असत.
¶ मग असे झाले की, आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणीएक दुष्ट आत्मा लागलेली मुलगी आम्हास आढळली, तिच्या अंगात येत असे, ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे.
मूर्तीपूजा, जादूटोणा, वैर, कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट,