TSK

TSK · लेवी 19:37

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी पाळा! कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.

¶ तुम्ही माझ्या आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्या; मी परमेश्वर आहे!

पाहा माझा देव परमेश्वर याने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हास शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घेण्यास जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे म्हणून मी ते सांगितले.

¶ तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास सांगण्यासाठी सांगितलेले विधी, नियम व आज्ञा दिल्या त्या या आहेत. जो प्रदेश तुम्ही वतन करून घेण्यासाठी यार्देनेच्या पैलतीरी जात आहात तेथे हे नियम पाळा.

त्याने तुम्हास ज्या आज्ञा, नियम, करार, शिकवण लिहून दिली ती तुम्ही पाळलीच पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही सर्व वेळ पालन केले पाहिजे इतर देवीदेवतांचे भय धरता कामा नये.

मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन.