TSK

TSK · लेवी 25:14

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करु नका व त्यास लुबाडू नका; मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नका.

त्यांनी नेहमी नि:पक्षपाती असले पाहिजे. त्यांनी लाच घेऊन न्यायनिवाडा करता कामा नये. पैसे पाहून भल्या भल्यांचेही डोळे फिरतात व ते निरपराध लोकांच्या म्हणण्याचा विपर्यास करतात.

मी हा येथे आहे; परमेश्वरासमोर व त्याच्या अभिषिक्तासमोर माझ्याविरूद्ध साक्ष द्या. मी कोणाचा बैल घेतला काय? मी कोणाचे गाढव घेतले काय? मी कोणाला लबाडीने लुबाडले आहे काय? मी कोणावर जुलूम केला आहे काय? मी डोळे बंद करून कोणाकडून लाच घेतली काय? माझ्याविरूद्ध साक्ष द्या, म्हणजे मी त्याची भरपाई करीन.”

¶ आणि आता आम्ही गुलाम झालो आहोत. या भूमीत, आमच्या पूर्वजांनी इथली फळे चाखावी आणि इथे पिकणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा म्हणून तू त्यांना दिलेल्या या भूमीत आम्ही गुलाम आहोत.

पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे, म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये.

जो कोणी गरिबाची आरोळी ऐकत नाही, तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही.

जो राज्य करणारा पुरुष गरिबांना जाचतो, तो काहीहीअन्न न ठेवणाऱ्या पावसासारखा आहे.

जो कोणी अधिकारी ज्ञानहीन असतो तो क्रूर जुलूम करणारा आहे, पण जो अप्रामाणिकपणाचा द्वेष करतो तो दिर्घायुषी होतो.

चांगले करण्यास शिका; न्याय मिळवा, पीडितांची मदत करा, पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा.

परमेश्वर वडील जन व त्याच्या लोकांचे अधिकारी यांच्यावर न्याय प्रकट करील. तुम्ही द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; गरिबांची लुटलेली मालमत्ता तुमच्या घरांमध्ये आहे.

तो, नीतीने वागतो व सत्य बोलतो, जुलूमजबरी करून मिळणारा लाभ तुच्छ लेखतो; जो लाच नाकारतो, घातपातांचा कट करीत नाही व दुष्कृत्याकडे पाहत नाही.

¶ पण तुझ्या दृष्टीस आणि हृदयात अनीतीने मिळवलेली मिळकत आणि निर्दोष व्यक्तीचे रक्त पाडणे, आणि पीडणे व जूलूम करणे या शिवाय काही नाही.

असा पुरुष रक्तपात करण्यासाठी लाच घेतो, तू अति प्रमाणात व्याज घेतो, तू तुझ्या कामाने शेजाऱ्याचे नुकसान केले आहेस, आणि तू मला विसरला आहेस. असे परमेश्वर देव जाहीर करतो.

जे तुम्ही गरिबांना तुडविता, आणि देशातील गरीबांना काढता. ते तुम्ही हे ऐका.

अजूनपण वाईटाचा पैसा आणि उणे धिक्कारलेले माप ही दुष्टांच्या घरांत आहेत.

काही शिपायांनीसुद्धा त्यास विचारून म्हटले, “आणि आमच्या बद्दल काय, आम्ही काय करावे?” तो त्यांना म्हणाला, “कोणाकडून जबरदस्तीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करू नका, तुम्हास मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”

¶ धनवान लोकहो ऐका, तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.