TSK

TSK · लूक 1:49

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, “मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा.

परमेश्वरासारखा कोणी पवित्र नाही, कारण तुझ्या शिवाय कोणी नाही, आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही,

हे देवा, तुझे नितिमत्व खूप उंच आहे; हे देवा, ज्या तू महान गोष्टी केल्या आहेस, त्या तुझ्यासारखा कोण आहे?

परमेश्वर, आपला देव ह्याची स्तुती करा, आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.

मग आमचे मुख हास्याने, आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत.

¶ प्रत्येकजण दुसऱ्याला हाक मारीत आणि म्हणत, “पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाधीश परमेश्वर! त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी भरून गेली आहे.”

¶ जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे? जो राजेशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे? जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारायला सामर्थ्य आहे, तो मीच आहे.

पण परमेश्वर माझ्यासोबत बलवान सैनिकाप्रमाणे आहे. म्हणून जे माझा पाठलाग करणारे ते पडतील. ते मला पराभूत करणार नाहीत. ते अतिशय लाजवले जातील, कारण ते त्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. कधी न विसरली जाणारी अशी त्यांची सर्वकाळीक अप्रतिष्ठा होईल.

¶ आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आमची मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे,

हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही? कारण तू एकच पवित्र आहेस; कारण सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील. कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.