TSK

TSK · लूक 1:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या पुत्रांना ही वस्रे घालून, त्यांना अभिषेक करावा व त्यांच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र कर म्हणजे मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील.

आणि अहरोनाला व त्याच्या पुत्रांना कमरबंद बांध व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशा प्रकारे या विधीने त्यांचे याजकपद कायमचे राहील, ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले ह्यांच्यावर संस्कार करावेत

आणि अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून पवित्र कर. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील;

पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या पित्याच्या आधीच मरण पावले. त्यांना अपत्य ही नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.

आपल्या पित्याच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या लेवींना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवीची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वरास मानणाऱ्या दाविदाने अशाच सूचना दिल्या होत्या.

लेव्याची आणि याजकांची अनेक गटामध्ये विभागणी केलेली होती. त्यापैकी प्रत्येक गटाला आपआपले विशेष कामकाज नेमून दिलेले होते. राजा हिज्कीयाने त्या सर्वांना आपला कारभार हाती घ्यायला सांगितले. होमार्पणे व शांत्यर्पणे वाहणे हे लेवीचे व याजकांचे नेमलेले काम होते. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे म्हणणे व परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे ही त्यांचे काम होते.

यरूशलेममधील या मंदिराच्या सेवेसाठी त्यांनी मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, याजकांची आणि लेव्याची त्यांच्या-त्यांच्या वर्गानुसार योजना केली.