TSK

TSK · लूक 10:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ सोर विषयी देववाणी, तार्शीशच्या जहाजानों, आक्रोश करा कारण तुमच्या जहाजासाठी बंदर व तुमच्यासाठी घर नाही, असे कित्तीमच्या देशापासून त्यांना प्रगट करण्यात आले आहे.

मोठी राष्ट्रे अपरिचित, कठिण भाषेचे, ज्यांची भाषा समजत नाही त्यांच्याकडे पाठवत नाही! जर मी तुला त्यांच्याकडे पाठवले तर ते तुझे ऐकतील!

¶ मी हे जाणून माझे मुख परमेश्वर देवाकडे वळवले, यासाठी की उपास करून व गोणताट व राख अंगावर घेऊन प्रार्थना व विनंत्या यांनी त्यास मागणे करावे.

¶ तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चात्ताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला.

¶ मग प्रेषितांनी परत येऊन आपण जे काही केले होते ते त्यास सविस्तर सांगितले. मग तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगराकडे एकीकडे गेला.

पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काहीजण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होता.”

कारण नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देवाने त्यांना या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे; त्यांनी पाहू नये असे डोळे आणि त्यांनी ऐकू नये असे कान दिले आहेत.’

आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाची वस्त्रे घालून, एक हजार दोनशे साठ दिवस देवाचा संदेश देतील.”