¶ ‹कारण हे दूरदेशी जाणाऱ्या मनुष्यासारखे आहे, ज्याने प्रवासास जाण्याअगोदर आपल्या चाकरांना बोलावून आपली मालमत्ता त्यांच्या हाती दिली.›
TSK
TSK · लूक 19:12
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ येशू त्यांना दाखले सांगून शिकवू लागला, ‹“एका मनुष्याने द्राक्षाचा मळा लावला व त्याच्याभोवती कुंपण घातले. त्याने द्राक्षरसासाठी कुंड खणले आणि टेहळणीसाठी माळा बांधला. त्याने तो शेतकऱ्यास खंडाने दिला व तो दूर प्रवासास गेला.›
¶ मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला.
¶ मग तो लोकांस हा दाखला सांगू लागला, ‹“एका मनुष्याने द्राक्षमळा लावला व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूरदेशी गेला.›
म्हणून पिलात त्यास म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, ‹“मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे. मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”›
त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेला मनुष्य येशू याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वास पटवले आहे.
¶ त्याने ती कृती ख्रिस्ताच्याद्वारे करून त्यास मरणातून उठविले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसविले.
तसाच ख्रिस्त हि, पुष्कळांची पापे वाहून नेण्यास एकदाच अर्पिला गेला आणि त्याची वाट पाहणाऱ्यांस पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी दुसऱ्याने दिसेल.
“पहा, तो ढगांसह येत आहे,” “प्रत्येक डोळा त्यास पाहील, ज्यांनी त्यास भोकसले तेसुध्दा त्यास पाहतील,” पृथ्वीवरील सर्व वंश “त्याच्यामुळे आकांत करतील.” असेच होईल, आमेन.