TSK

TSK · लूक 2:34

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मग योसेफाने याकोब त्याचा बाप याला आणले आणि फारोच्या समोर सादर केले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला.

¶ मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण, होमार्पण, व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.

कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे, आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत.

पाहा, मी व मुले जी परमेश्वराने मला दिली ती इस्राएलास चिन्हे व चमत्कारांसाठी जो सैन्याधीश परमेश्वर सीयोन पर्वतावर वसतो त्याने ठेवली आहेत.

‹मनुष्याचा पुत्र खातपीत आला. ते म्हणतात, पाहा, हा खादाडा व दारूबाज, जकातदार व पापी लोकांचा मित्र, परंतु ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते.›

‹जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील परंतु जर हा दगड कोणावर पडेल तर त्याचा भुगाभुगा होईल.”›

म्हणू लागले, हे परमेश्वराचे भवन मोडून तीन दिवसात परत उभारणाऱ्या, स्वतःला वाचव जर तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये.

‹कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.›

¶ यहूद्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हास भूत लागले आहे, हे जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे की नाही?”

¶ “म्हणून, इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्यास देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.”

प्रभूविरूद्ध व त्याच्या ख्रिस्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी एकत्र जमले.’

¶ शौल यरूशलेम शहरामध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, म्हणून तो महायाजकाकडे गेला.

परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आरडाओरड करीत म्हटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत.

परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे, कारण या गटाविरुद्ध सगळीकडे लोक बोलतात हे आम्हास माहीत आहे.

परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे.

¶ हा मलकीसदेक शालेमाचा राजा व तो सर्वोच्च देवाचा याजक होता. अब्राहाम राजांचा पराभव करून परत येत असताना मलकीसदेक त्यास भेटला. मलकीसदेकाने त्यास आशीर्वाद दिला.

¶ म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.

ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य! आहात कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे.