TSK

TSK · मला 3:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

माझ्या पूर्वजांनी इतर देशांचा नाश केला. त्यांच्या सर्व देवांपैकी आपल्या लोकांस विनाशातून सोडवणारा असा कोणी देव होता काय? तर तुमचा देव तरी तुम्हास माझ्या सामर्थ्यापासुन वाचवू शकेल असे वाटते का?

ईयोबासारखा आणखी कोणी आहे का? जो निंदा पाण्याप्रमाणे प्राशन करतो.

तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे, त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही.

जे असे म्हणतात, “देव घाई करो, तो त्वरीत कृती करो, म्हणजे आम्ही ते झालेले पाहू, आणि इस्राएलाच्या पवित्र्याच्या योजना आकार घेऊन येवोत, म्हणजे त्या आम्ही जाणावे. त्यांना हायहाय!”

तू कोणाची निंदा आणि अपमान केलास? आणि कोणाविरूद्ध आवाज उंच केलास आणि आपले डोळे गर्वाने उंचावले? इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या विरुध्द.

तुम्ही आपल्या तोंडाने मजविरूद्ध जेव्हा फुशारकी मारली; तुम्ही माझ्याविरूद्ध पुष्कळ गोष्टी बोललात. मी ते ऐकले आहे.”

तुम्ही म्हणता, “असे का नाही?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारूण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षीदार आहे. ती तर तुझी सहचारिणी असून व तुझ्या कराराची पत्नी असून तिच्याशी तू विश्वासघाताने वागला आहेस.

मनुष्य देवाला लुटणार काय? तरीही तुम्ही मला लुटता. पण तुम्ही असे म्हणता, ‘आम्ही तुझे काय लुटले आहे?’ तुम्ही दशमांश व अर्पणे यांविषयी मला लुटता.

तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या भवनात बसणारा असा आहे.