कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; आणि त्याच्या खाद्यांवर सत्ता राहिल; आणि त्यास अद्भूत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा राजा असे म्हणतील.
TSK
TSK · मार्क 10:47
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
परमेश्वर असे म्हणतो, पाहा! असे दिवस येत आहेत. “मी दावीदाकरीता नितीमान अंकुर उगवीन.” तो राजा म्हणून राज्य करेल, तो देशात न्याय व न्यायीपण करील, आणि भरभराट घेऊन येईल.
व नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.
सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?”
रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभू येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.”
जमावाने उत्तर दिले, “हा गालील प्रांतातील नासरेथ नगरातून आलेला, येशू संदेष्टा आहे.”
मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्यास पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांस म्हणाली, “नासरेथकर येशूबरोबर हा होता.”
¶ मग जेथे तो लहानाचा मोठा झाला होता त्या नासरेथांत तो आला आणि शब्बाथ दिवशी त्यांच्या प्रथेप्रमाणे सभास्थानात जाऊन ग्रंथ वाचण्यासाठी उभा राहिला,
नथनेल त्यास म्हणाला, “नासरेथमधून काहीतरी उत्तम निघू शकेल काय?” फिलीप्पाने त्यास म्हणाला, “येऊन पाहा.”
त्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्हीपण गालील प्रांतातले आहात काय? शोधा आणि बघा, कारण गालील प्रांतातून संदेष्टा उद्भवत नाही.”
कारण आम्ही त्यास असे बोलताना ऐकले, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आम्हास लावून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील.”
ती सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्मास आला.