TSK

TSK · मार्क 14:49

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

हे देवा, मला तार; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन पोहचले आहे.

¶ सत्तर सप्तकांचा काळ तुझ्या लोकांसाठी आणि तुझ्या शहरासाठी घोषीत करण्यात आला होता; ज्यात पापाचा अंत व्हावा, अधार्मिकतेसाठी प्रायश्चित करावे, सनातन धार्मिकता उदयास यावी, दृष्टांत व स्वप्न पूर्ण व्हावे आणि पवित्रस्थानाचा अभिषेक व्हावा.

¶ येशू परमेश्वराच्या भवनात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक लोक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हास कोणी दिला?”

‹परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेष्ट्यांनी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.”› नंतर येशूचे सर्व शिष्य त्यास सोडून पळून गेले.

¶ ते परत यरूशलेम शहरास आले आणि येशू परमेश्वराच्या भवनात फिरत असता मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले.

¶ तो दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असे. मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक, लोकांचे पुढारी त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते.

‹मी तुम्हास सांगतो, तो अपराध्यांत गणलेला होता, असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्याठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्या विषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.”›

¶ तो त्यांना म्हणाला, ‹“याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हाबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे यामध्ये माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”›

¶ मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, ‹“कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.›

¶ पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, ‹“मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”›

येशूने त्यास उत्तर दिले, ‹“मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानात आणि परमेश्वराच्या भवनात, सर्व यहूदी जमतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले आणि गुप्तपणे मी काही बोललो नाही.›