पण आजपर्यंतही परमेश्वराने तुम्हास समजायला मन, बघण्यास डोळे व ऐकण्यास कान दिलेले नाही.
TSK
TSK · मार्क 4:12
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
त्यांना कळत नाही, किंवा त्यांना समजत नाही, कारण त्यांचे डोळे आंधळे आहेत व ते पाहू शकत नाही, आणि त्यांच्या हृदयाला आकलन होत नाहीत.
खचीत मी एफ्राईमाला असे रडताना ऐकले आहे की, ‘तू मला शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली. अप्रशिक्षीत वासराप्रमाणे मला परत माघारी आण आणि मी परत येईन, कारण परमेश्वरा, तू माझा देव आहेस.
पण पापी त्याने केलेल्या दुष्कर्मापासून वळेल तर आणि न्यायाने व नीतिने वागेल, तर त्यामुळे त्याचा जीव वाचेल.
मग तो म्हणाला, ‹“देवाच्या राज्याची गुजे जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु बाकीच्या लोकांस ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांनी दिसत असता पाहू नये व त्यांनी ऐकत असता समजू नये.›
तर तुमची पापे पुसून टाकली जावी, म्हणून पश्चात्ताप करा, व फिरा अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावे;
कारण नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देवाने त्यांना या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे; त्यांनी पाहू नये असे डोळे आणि त्यांनी ऐकू नये असे कान दिले आहेत.’
त्यानंतर ख्रिस्तापासून जर ते दूर गेले तर त्यांना पश्चात्तापाकडे वळवणे अशक्य आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या हानिकरता ते देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभावर खिळतात व लोकांच्या अवकृपेच्या समोर त्यास आणतात.