ते एकमेकांना म्हणाले, “खरोखर आपण आपल्या भावाविषयी अपराधी आहोत. कारण आपण त्याच्या जिवाचे दुःख पाहिले तेव्हा त्याने काकुळतीने रडून आपणास विनंती केली, परंतु आपण त्याचे ऐकले नाही. त्यामुळेच आता आपणांस हे भोगावे लागत आहे.”
TSK
TSK · मत्त. 27:4
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
फारोने तातडीने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. तो म्हणाला, “तुमचा देव परमेश्वर याच्याविरुद्ध व तुम्हाविरुध्द मी पाप केले आहे.
मग शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; कारण मी परमेश्वराची आज्ञा व तुझी वचने मोडली आहेत, ते यामुळे की, लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले.
तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वर तुला सोडून गेला आहे व तुझा विरोधी झाला आहे; तर तू कशाला मला विचारतोस?”
मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. सारे यरूशलेम त्यांच्या रक्ताने माखले. या पापांना परमेश्वराजवळ क्षमा नव्हती.
“या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत, तुम्ही सर्व वायफळ सांत्वनकर्ते आहात.
पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध मनुष्यास मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्यासही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरच मला तुमच्याकडे ह्यासाठी पाठवले आहे की ही सर्व वचने तुमच्या कानात बोलावी.”
तो न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्यास एक निरोप पाठवून कळवले, “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्यामुळे स्वप्नात मला आज दिवसभर फार दुःखसहन करावे लागले आहे.”
आता शताधिपतीने, त्यांच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा खरोखर देवाचा पुत्र होता.”
पिलात तिसऱ्यांदा त्यांना म्हणाला, “का? या मनुष्याने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्याविरुद्ध काहीही आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो.”
जेव्हा रोमी शताधीपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”
येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत, पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्यास जिवे मारावे.
आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.
ते लोक ‘आम्ही देवाला ओळखतो’ असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्यास नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.
निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात.
त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उत्सव करतील व एकमेकांना भेटी पाठवतील कारण त्या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांस अतोनात पीडले होते.